![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जून २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope )
अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.
वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.
कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. सहकार्यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. जीवावर उदार होऊ नका. विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.
कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.
तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
काही गोष्टी अचानक सामोर्या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्यांचा मान राखावा.
मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.