![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल.आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्यांचा मान राखावा.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
औद्योगिक स्थिरता लाभेल. घरात काही जुजबी बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
तुमच्या ज्ञानात भर पडेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा.