बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – २७ सप्टेंबर – बॉलिवूडमधील कलाकार प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अभिनेत्यांना निर्मात्यांनी काम देऊ नये. ड्रग्ज घेणाऱ्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं.

अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटाचं चित्रीकरणही बंद पाडण्यात येईल, असा इशारा देत सुशांतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीची मागणी संसदेत करणारे खासदार रवि किशन यांनी आपल्याला धमकी मिळत असल्याचं सांगितलं आहे. मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही मी तयार आहे, असं रवि किशन म्हणाले.

 

ही बातमी दैनिक लोकमतने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *