Horoscope Today दि. २८ ऑगस्ट २०२६ ; आज जुनी येणी वसूल होतील ….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
समजून-उमजून गुंतवणूक करावी. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
जोडीदाराशी सहमत राहावे लागेल.आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
आत्मविश्वास कायम ठेवावा. नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
उत्तम गृहसौख्य लाभेल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. झोपेची तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
उत्साह कायम ठेवावा. मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा आमलात आणाल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनातील इच्छा साकारता येईल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. मन काहीसे चंचल राहील. प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सौम्य शब्दांचा वापर करावा. घरात टापटीप ठेवाल.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *