![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.
मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्या प्राधान्याने पार पाडाल. थोडी काटकसर करावी लागेल. दिवस मध्यम फलदायी.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
जुने आजार अंगावर काढू नका. व्यापार्यांना हातमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका. समस्यांचे निराकरण शक्य.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
घरातील वातावरण शांत ठेवा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. प्रवास जपून करावा.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे.