![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.
मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.