Horoscope Today दि. २० ऑक्टोबर ; आज व्यावसायिक योजनांना गती मिळेल. ….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्यबाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्‍यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उद्भवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *