भक्तीचा गजर, समालख्यात संत समागमाची जय्यत तयारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- पिंपरी-चिंचवड, दि. १९ ऑक्टोबर : अध्यात्माच्या नावाने केवळ गोडवे गाण्यापेक्षा सेवा, समर्पण आणि मानवतेची शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरविणे महत्त्वाचे! हाच संदेश घेऊन ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी रंगणार आहे. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने श्रद्धाळू सहभागी होणार असल्याची माहिती आहे. आता प्रश्न एवढाच की, या चार दिवसांच्या आध्यात्मिक मेळाव्यातून प्रेम, बंधुभाव आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश प्रत्यक्ष जीवनात किती उतरतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

समागमाच्या तयारीने समालख्यातील मैदानाचे रूप पालटले असून, विशाल मंडप, अत्याधुनिक एलईडी स्क्रीन आणि भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. श्रद्धाळूंनी उभारलेले भव्य स्वागतद्वारही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या सजावटीमागे केवळ कलात्मकता नसून सामूहिक श्रम आणि सेवाभाव असल्याचे आयोजक सांगतात. संपूर्ण परिसराचे चार प्रमुख विभागांत नियोजन करण्यात आले असून, गर्दीचे व्यवस्थापन, वाहतुकीची सुलभता आणि भाविकांना आवश्यक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरूंच्या प्रेरणेने सर्व व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. मात्र, अशा मोठ्या धार्मिक आयोजनात भव्य मंडप आणि आकर्षक प्रवेशद्वारांइतकेच स्वच्छता, सुरक्षितता, पाणीपुरवठा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांनाही महत्त्व द्यावे लागणार आहे.

संत समागमाचा केंद्रबिंदू ब्रह्मज्ञान, भक्ती, आत्मचिंतन आणि विश्वबंधुत्व हा असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. प्रवचने, भजने आणि सत्संगातून मानवी मूल्यांचा जागर केला जाणार आहे. धर्माच्या नावावर भिंती उभारण्याऐवजी म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *