नोकरधारकांसाठी चांगली बातमी ! आली PF ची WhatsApp सर्व्हिस,

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो .- प्रतिनिधी – नवीदिल्ली – 14 ऑक्टोबर : एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आपल्या ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी (Grievance Redressal) WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार (Labour Ministry) मंत्रालयाने म्हटले आहे की EPFOकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. ईपीएफओ, सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्विटरचे ऑनलाइन तक्रारीचे रिझोल्यूशन पोर्टल (EPFIGMS Portal) हे 24 तास कार्यरत कॉलसेन्टर ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करतात.

कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार EPFO आपल्या सदस्यांसाठी WhatsApp आधारित हेल्पलाइन आणि तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता EPFO च्या सर्व 138 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये WhatsApp हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणताही संबंधित पक्ष त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरून EPFO शी संबंधित सेवांबद्दल तक्रार करू शकतो.

EPFOच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रादेशिक कार्यालयाचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी करण्यात आले आहेत. या EPFO हेल्पलाईनचा हेतू डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करून भागधारकांना आत्मनिर्भर बनविणे आहे. तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे आणि व्हाट्सएपद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावी यासाठी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *