नेटवर्क ची बोंबाबोंब ; काल सकाळपासून अर्ध्या राज्यातील आयडिया व्होडाफोनची रेंज गायब

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो – .आज सकाळपासून पुण्यातील काही भागांत आयडिया-व्होडाफोनच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. तशी रेंज ची समस्या नेहमीच असते . काही ठोस उत्तर कंपनीकडूनही ग्राहकांना मिळत नसल्यामुळे सध्या #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. दरम्यान कालपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना सकाळपासून नेटवर्क गेल्याने आला. काही तासांपूर्वीच पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना रेंज आली आहे. पण त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले. आपण फक्त वेळेवर रिचार्ज करा आणि बिल भरा.

कालपासूनच कंपनीकडे पुण्यातील काही ग्राहकांनी तक्रार केल्या आहेत. पण लवकरच सेवा सुरु केली जाईल, तसेच तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर त्यांना कंपनीने दिले आहे. पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाही. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *