बार्कचा महत्त्वपूर्ण निर्णय; चॅनेल्सच्या टीआरपीवर तीन महिन्यांची बंदी,

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो – मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (बार्क) वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तात्पुरती स्थगिती घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही स्थगिती पुढच्या आठ ते 12 महिन्यांसाठी असू शकते. बार्पच्या तांत्रिक समितीने टीआरपी प्रकियेचा पुनर आढावा घेऊन ती प्रमाणित केल्यानंतरच टीआरपी रेटींग पुन्हा सुरू होणार आहे.

नकली टीआरपीच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत बार्कचे अध्यक्ष पुनित गोयंका यांनी व्यक्त केले. टीआरपी मूल्ममापनासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि पद्धत अधिकाधिक निर्देष व्हावी, यादृष्टीने काय प्रयत्न करता येतील, याचा आढावा यादरम्यान घेण्यात येणार असल्याचे पुनित गोयंका म्हणाले.

बार्कचे सीईओ सुनील लुल्ला म्हणाले, बार्क आपले काम प्रामाणिकपणे करते. देशात नेमकं काय पाहिले जाते याची माहिती आम्ही खरेपणाने आणि विश्वासाने जाहीर करतो. म्हणून बेकायदा कामाला पूर्णपणे आळा बसेल असा पर्याय बार्क शोधत आहे.

बार्कचे काम काय
कोणतेही टेलिव्हिजन चॅनेल किती काळ पाहिले जाते, याची माहिती बार्कद्वारे ब्रॉडकास्टर्स, जाहिरातदार आणि जाहिरात एजेन्सी यांना पुरवली जाते. बॉर्क ही टीव्ही चॅनेल्सच्या दर्शकतेचे मोजमाप करणारी मोठी संस्था आहे. दर गुरुवारी बार्प आपला डेटा जाहीर करते. प्रेक्षकांचे वय, शिक्षण आणि उत्पन्न यांच्या वर्गीकरणानुसार कोणता शोला किती लोक बघतात, याची माहिती दिली जाते. यावर चॅनेल्सचा जाहिरात महसूल अवलंबून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *