‘अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल’

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे.अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सुरू होणारा सेल सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते यांनी दोन्ही कंपन्यांच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली.

“बंगळुरूस्थित दोन्ही अॅपनी दक्षिण भारतातील इतर भाषांना प्राधान्य दिलं, पण मराठीत अॅप सुरू केलं नाही. त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास त्यांनी अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय द्यावा, अन्यथा दोन्ही कंपन्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल. याप्रकरणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *