कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. १६ ऑक्टो -गेल्या सहा वर्षांत भाजप सरकारने कृषीव्यवस्थेचं वाटोळं केलं आहे. कृषी व्यवस्था घाईगडबडीत भांडवलदार मित्रांकडे बहाल करण्याचा डाव मांडण्यात येत आहे. कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारने नवं कृषी विधेयक नुकतंच मंजूर केलं. याविरोधात आयोजित एका व्हर्चुअल सभेत चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“गेल्या अनेक वर्षांत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताची कृषी यंत्रणा उभी केली होती. ती संपूर्ण यंत्रणा मागच्या सहा वर्षांत मोदी सरकारने मोडीत काढली. सर्व क्षेत्रात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे,” असं चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *