बुडत्याला काडीचाही आधार खुप मोलाचा असतो म्हणून केंद्र सरकारने जनतेला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी चक्रवाढ व्याज माफ करून धिर दिला आहे …..पि.के.महाजन.

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २५ऑक्टो – पुणे :लाॅकडावून च्या कालावधीतील उत्पन्ना स्तोत्र बंद असल्या मुळे कर्ज धारकांचे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आले होते. ज्याला आपण मोराटोरीयम पीरियड म्हणतो….दोन कोटीच्या आत असलेल्या कर्जदाराकांना मोराटोरीयम पीरियड चे सहा महिन्याचे व्याजावरील व्याज माफ करण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे, सुत्रानुसार तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे असे समजते. ज्यांनी लाॅकडावून मध्येही कर्जाचे हप्ते पुर्णपणे भरले आहेत. किंवा काहींनी कर्जाचे काही हप्ते अर्धवट भरलेत

अशांनाही कॅश बॅक करून हया सवलतींचा फायदा मिळणार आहे असे समजते. सरकार ने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्की च उपयोग होईल तसेच जनतेलाही आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणार आहे. बुडत्याला वाचविण्यासाठी काडीचा आधार दिला तरी मोलाचा असतो. बरेच दिवस पेंडींग पडलेल्या विषयावर सरकार ने सकारात्मक निर्णय घेवून मार्गी लावला आहे. ह्या बाबतीत याचिका दाखल करणारयाचे व उच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजे. कारण एखाद्या सामाजिक अन्याय होणारया विषयाला वाचा फोडने व त्यावर न्यायालयाने खरया अर्थाने न्याय देणे या दोघांची भुमिका महत्वाची असते……..पि.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *