महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २७ ऑक्टो – मुंबई – दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यावर काल भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू; नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवू नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल,’ अशा शब्दात राणे यांनी इशारा दिला आहे.
काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ऑनलाईन दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला ५० जणांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर व नारायण राणे यांच्यावर टीका केली.
नारायण राणे म्हणाले, इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे यांकडून पाहून गप्प बसलो आहे. पण राणे कुटुंब,तसेच भाजपवर आगपाखड करत असाल तर ३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिले जे अनुभवल ते सर्व बाहेर येईल, असा गर्भित इशारा राणे यांनी यावेळी दिला.