दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जॅकलिननं आपल्या स्टाफ मेंबरला दिली स्पेशल ‘कार’ गिफ्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २७ ऑक्टो – मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) केवळ अभिनय किंवा तिच्या डान्स कौशल्यासाठीच नव्हे तर उदारपणाबद्दल देखील ओळखली जाते. बॉलिवूडची ‘सनशाइन गर्ल’ अर्थात जॅकलिन तिच्या स्टाफ मेंबर्समध्ये देखील आवडीची आहे. तिने नुकतेच तिच्या एका स्टाफ मेंबरला कार गिफ्ट केली आहे. सोशल मीडियावर (Social Media) वर जॅकलिनच्या या कामाचं कौतुक होत आहे. यावेळचे तिचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती या स्टाफ मेंबरच्या हातात गाडीची चावी देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री जॅलकिन फर्नांडिसने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिच्या स्टाफ मेंबरला एक खास सरप्राइज दिले आहे. जो तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून तिच्याबरोबर आहे. अभिनेत्रीने त्या स्टाफ मेंबरला कार गिफ्ट केली होती, पण त्या गाडीची डिलिव्हरी कधी होईल हे तिला माहित नव्हते. सेटवर शूटिंग सुरू असताना या कारची डिलिव्हरी करण्यात आली. त्यामुळे जॅकलिन यामध्ये ट्रॅफिक पोलिासाच्या वर्दीत दिसत आहे. कार डिलिव्हर झाली तेव्हा ती तिच्या एका सिनेमाचं शूटिंग करत होती.

व्हिडीओमध्ये ती एका ट्रॅफिक पोलिसाच्या वेषात दिसत आहे. तिच्या हातात मिठाई आणि पुजेची थाळी देखील आहे. गाडीसमोर नारळ देखील फोडण्यात आला.

https://www.instagram.com/fifafoozofficial/?utm_source=ig_embed

याआधी जॅकलिनने तिच्या मेकअप आर्टिस्टला देखील एक कार गिफ्ट केली होती. त्यामुळे तिच्या दिलदार प्रवृत्तीचं अनेकांकडून कौतुक केलं जातं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये ‘किक 2’ आणि रणवीर सिंहबरोबरच्या ‘सर्कस’मध्ये ती दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *