न्यायालयाने फेटाळली ट्रम्प यांची मतगणना थांबवण्याची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ नोव्हेंबर – वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली आहे. आता विजयाच्या उंबरठ्यावर बायडन पोहोचले असले तरी मतगणनेच्या विरोधात ट्रम्प न्यायालयात गेल्यामुळे अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान न्यायालयाने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस फेटाळल्या आहेत. या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी ट्रम्प यांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.

दुसरीकडे आपल्या समर्थकांकडे जो बायडन यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. बायडन यांनी कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी आवाहन केले आहे. कायद्याची लढाई अमेरिकेत लढणे हे फार खर्चिक आहे. जवळपास 75 कोटी रुपयांचा खर्च यासाठी येऊ शकतो. त्यामुळे न्यायालयात ट्रम्प गेल्यानंतर बायडन यांच्या टीमने तात्काळ ‘बायडन फाईट फंड’ स्थापन केला असून या माध्यमातून बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *