![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १७ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
वाहन चालवितांना काळजी घ्यावी. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
इतरांच्या मदतीशिवाय कामे कराल. सारासार बुद्धीचा वापर करावा. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्या. न्यायी वृत्ती दर्शवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
गायन कलेत प्रगती कराल. उदारपणा दाखवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल. घशाचे विकार त्रास देवू शकतात.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मानीपणा दाखवाल. तुम्हाला सामाजिक दर्जा मिळेल. आपले मत उत्तमपणे मांडाल. हजरजबाबीपणा दाखवाल. कामाचा ताण जाणवेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शाब्दिक चकमक टाळावी.विचारांना योग्य चालना द्यावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
सामाजिक वादात सहभाग घेवू नये. लहान मुलांमध्ये रमून जाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात सतर्कता ठेवावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. सतत खटपट करत रहाल. मैत्रीत सलोखा ठेवावा. व्यावसायिक फायद्याचा विचार कराल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधावा.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
व्यावसायिक बदलांना सामोरे जाल. नोकरदारांना बदलीचे योग येतील. हातातील कामास गती प्राप्त होईल. धोरणीपणाने वागाल.धैर्याने कामे कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तांत्रिक ज्ञान करून घ्यावे. मैदानी खेळत प्रगती होईल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. चिकाटी सोडू नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य द्व्यीगुणीत होईल. जोडीदाराचे कौतुक कराल. खर्चाचे योग्य नियोजन करावे. संयम बाळगावा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
काही बाबींकडे दुर्लक्ष करावे. समजूतदारपणा दाखवावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांचा विश्वास संपादन करावा. कफ विकार जाणवू शकतात.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
भाजणे,कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. तिखट पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. उष्णतेचे विकार जाणवू शकतात.