पत्रकारांनी लोकशाहीभिमुख पत्रकारिता करावी-पी. के. महाजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ नोव्हेंबर -पुणे – लोकशाही जिवंत रहावी म्हणून पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. एवढेच काय तर पत्रकार हा समाजमनाचा आरसाही मानला जातो. पंरतु पत्रकारच हुकूमशहासारखे वागून या स्तंभाला सुरुंग लावणार असतील तर अशा पत्रकारांना न्याय व्यवस्थेने वेळीच कारवाई करून धडा शिकवलाच पाहिजे कारण की अशा पत्रकारीतेमुळे न्याय व्यवस्थेला सत्य परिस्थितीवर न्यायदेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. परिणामी न्यायव्यवस्थेकडून चुकीचा न्याय दिला जावू शकतो. ज्यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होवू शकतो. त्यामुळे समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांनी लोकशाहीभिमुख पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ कर सल्लागार पी. के. महाजन यांनी केले आहे.

पत्रकारांना समाजात मानाचे स्थान असते. कारण पत्रकार जिवाची बाजी लावून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणत असतात. पत्रकारीतेचे परीणाम समाज व्यवस्थेवर तसेच न्यायव्यवस्थेवर होत असतात. म्हणून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पत्रकारांना आपले हे पवित्र कर्तव्य पार पाडायचे असते. असे अनेक पत्रकार आपली जबाबदारी चोखपणे पार पाडीत आहेत….ज्यांच्या मुळे आपल्या देशात लोकशाही टिकून राहण्यास बळ मिळत आहे. पत्रकारांनी जिवाचे रान करूनही तत्कालीन न्यायव्यवस्थेकडून पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नसेल म्हणून न्याय मिळण्याची आशाच सोडून द्यावी, अशी अपेक्षा करने कितपत योग्य आहे? पीडित कुटुंब न्याय मिळेपर्यंत धडपड करणारच व न्यायव्यवस्थेकडे कधी हक्काने तर कधी गयावया करून न्याय मागणारच. कारण ज्याच्यावर अन्याय झालेला असतो त्यालाच त्याच्या वेदना होत असतात. म्हणतात ना ज्याचं जळतंय, त्यालाच चटके बसत असतात. म्हणून न्यायदेवतेवर मरेपर्यंत विश्वास ठेवावाच लागतो. जोपर्यंत न्यायव्यवस्था सत्याचीच बाजू धरेल तोपर्यंत लोकशाहीला कोणीही धक्का लावू शकणार नाही. असेही महाजन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *