महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – वॉशिंग्टन – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि संपूर्ण जगाच्या लक्ष लागून राहिलेल्या महासत्तेच्या गादीवर कोण बसणार याचे उत्तर अखेर मिळाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन 46 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मान मिळाला आहे.
अनेक अर्थांनी ही निवडणूक गाजली आणि गाजते आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेताल आणि निरर्थक वागण्यामुळे. मात्र, त्यांना अमेरिकन जनतेने धडा शिकवला आहे असे म्हणायला हरकत नाही. 20 नोव्हेंबर 1942 रोजी जन्मलेल्या बिडेन वयाच्या 78 व्या वर्षी पदाची शपथ घेतील. ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष होतील. 1972 मध्ये जेव्हा ते सिनेटवर निवडून गेले तेव्हा ते सर्वात तरुण लोकांपैकी एक होते ही एक रोचक बाब देखील आहे.
1972 मध्ये बायडेन सिनेटवर निवडून आल्यानंतर लगेचच त्यांना एक मोठा धक्का बसला. त्यांची पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यांचे पुत्र हंटर आणि ब्यूओही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पाच वर्षे बायडेन यांनी आपली बहीण वॅलेरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने बीओ आणि हंटरची संगोपन केले. पत्नी नीलियाच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर बायडेन यांनी जिलशी लग्न केले. त्यांना अॅश्ली नावाची एक मुलगी आहे.
राष्ट्राध्यक्ष पदासाठी तिसरा प्रयत्न
बायडेन यांनी 1988 आणि 2008 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भाग घेतला. परंतु त्यांना अपयश आले. 1998 मध्ये त्यांच्यावर साहित्यिक चोरीचा आरोप झाला आणि माघार घ्यावी लागली.
दोनदा उपराष्ट्राध्यक्षओबामा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बायडेन 2008 ते 2016 या काळात त्यांच्या कार्यकाळात दोनदा उपराष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. या निवडणुकीतही ओबामांनी त्यांना बरीच साथ दिली.
वादाशीही संबंध राहिला.ब्रिटन लेबर पार्टीच्या नील किन्नॉक यांच्या भाषणातील साहित्य चोरीचा आरोप झाल्याने बायडेन वादात सापडले होते. त्याचवेळी एका महिलेने बायडेन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. ही घटना 1993 मध्ये कॅपिटल हिलच्या तळ मजल्यावरील बायडेन यांच्या ऑफिसमध्ये ही घटना घडल्याचा दावा केला होता. ती महिला त्या दिवसांत ती तिथे काम करत होती. बायडेन यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि असे म्हटले की असे कधी झाले नव्हते.
ट्रम्प यांचे निर्णय बदलण्याची घोषणा ;बिडन यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की तो ट्रम्प यांचे अनेक निर्णय बदलतील. यामध्ये अमेरिकन देशांतर्गत समस्या आणि परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.