पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा वितरीत

Spread the love

Loading

हाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० नोव्हेंबर -पुणे – : पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा म्हणून २ हजार २९७ कोटी वितरीत केले आहेत. तर ४ हजार ७०० कोटी आम्ही दिवाळीनंतर देऊ असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देत असलेल्या मदतीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरीत केल्याचे ते म्हणाले.

आम्ही निधी देण्याची तयारी केली होती मात्र आचारसंहिता लागली. कुठे आचारसंहितेचा भंग होऊ नये आम्ही पत्र लिहले होते. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजमधील ५६६ कोटी विदर्भात, मराठवाड्यात २,६३९ कोटी, नाशकात ४५० कोटी, पुण्यात ७२१ कोटी, कोकणासाठी १०४ कोटी असे पॅकेज राज्य सरकारने घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *