महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – :नागा साधूचे जग अनेक गूढ रहस्यांनी भरलेले आहे. कुंभमेळा सुरू होतच नागा साधु अचानक दिसतात आणि मेळा संपला की ते गायब होतात. त्यानंतर, ते पुढच्या कुंभमेळा किंवा अर्ध-कुंभमध्येच दिसतात. आज नागा साधुच्या रहस्यमय जीवनाविषयी जाणून घेऊयात.
नागा साधुंच्या बाबतीत असे म्हटले जाते की, ते एकाच वेळेचे जेवण करतात आणि भिक्षा मागूनच त्यांना पोट भरावे लागते. जास्तीत-जास्त सात घरांमधून भिक्षा घेण्याचा अधिकार असतो. जर त्यांना सात घरातून भिक्षा मिळाली नाहीत तर उपाशी पोटी रहावे लागते.नागा साधुंना कठोर नियमांचे पालन करावे लागते. ते पलंगावर झोपत नाही त्यांना फक्त जमिनीवरच झोपावे लागते, कितीही गरमी किंवा थंडी असली तरीही त्यांना या नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू त्यांची ओळख ही लपवून ठेवतात.असे म्हटले जाते की, नागा साधू एका जागेवर जास्त दिवस कधीच राहत नाही. काही वर्ष गुहेत किंवा जंगलात राहिल्यानंतर ते परत दुसऱ्या जंगलात जातात. म्हणूनच त्यांच्या गुप्त स्थानाबद्दल कोणालाही माहिती नसते. कुंभमेळ्यातील साधू नग्न अवस्थेतच राहतात. काही नागा साधू कपडे ही परिधान करतात.
असे म्हटले जाते की, नागा साधुकडे रहस्यमय शक्ती असते आणि ही शक्ती कठोर तपस्या करून प्राप्त करतात. नागा साधुना भगवान शिवाचे भक्त मानले जाते. यामुळे त्यांनी संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले असते. साधू जंगलामध्ये राहून कंदमुळाच्या आधारे आपले संपूर्ण जीवन घालवितात.