फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल ‘; आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ नोव्हेंबर – मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर उद्या आंदोलन करण्याचा इशारा देणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व वडनेराचे आमदार रवी राणा या राणा दाम्पत्यास पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

शेतक-यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केले तर कारागृहात डांबले! शेतक-यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध! २५-५० हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणा-यांना शेतक-यांचा इतका तिरस्कार का? असा फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रश्न केला आहे.

तसेच, निवेदन स्वीकारून शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे समाधान तरी शेतक-यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

या अगोदर देखील शेतक-यांच्या विविध मागण्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला होता. शेतक-यांची दिवाळी काळी करणा-या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *