‘महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा सिद्ध; मुख्यमंत्री राज्य हाताळण्यात अपयशी’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ नोव्हेंबर – नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षानंही राज्य सरकारला पुन्हा एका महिला सुरक्षेततेच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राज्य हाताळण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. भाजपनंही राज्य सरकारवर निशाणा साधत आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. तर, भाजप नेते यांनी थेट मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.

‘बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्देवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कोणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *