महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ नोव्हेंबर – कार्यसम्राट आमदार श्री.अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.शशिकांत भाऊ घुले यांच्यावतीने प्रभागातील आरोग्य कर्मचारी, विद्युत, पाणीपुरवठा, एम.एस.ई.बी व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी सणाचे औचित्य साधून ज्यांनी प्रभागाची कोविडच्या ( कोविड – 19 ) काळात प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचे व मूलभूत सोई सुविधांची काळजी घेतली व काम केले त्यांना श्री.शशिकांत भाऊ घुले यांच्यावतीने फराळ वाटप करून उचित सन्मान करण्यात आला.
यावेळी हरिओम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.नामदेव गोगावले, पोलीस पाटील श्री.पांडुरंग घुले पाटील, श्री.श्रीकांत घुले सर, श्री.काळूराम गोडांबे सर, श्री.विठ्ठल तात्या घुले, श्री.नारायण काळे, श्री.बाळासाहेब देवकर, श्री.श्रीहरी झपके, उद्योजक श्री.समीर झपके, श्री.कमलेश घुले, श्री.स्वप्निल घुले, श्री.पप्पू शेठ घुले, श्री.पाटील बुवा घुले, श्री.परशुराम घुले, श्री.दशरथ घुले, श्री.काळू भाऊ वाघमारे, श्री.श्याम मेवाती, श्री.प्रवीण शिंदे, सौ.वाघमारे मॅडम, श्री.आप्पा बाराथे, श्री.अनिल बेनाडे, श्री.नागुर साहेब, श्री.शेरे काका, श्री.ज्ञानोबा घुले, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री.शशिकांत भाऊ घुले उपाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांनी केले.