बँक… एका रात्रीत डबघाईला जात नाही त्या मुळे ही जबाबदारी रिझर्व्ह बँकऑफ इंडिया ने घ्यावी…….पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार.

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ नोव्हेंबर – पुणे – बॅंका डबघाईला येईपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले काम चोख पणे करत नसेल तर ह्या फसवणूकी ला रिझर्व्ह बँक च जबाबदार आहे हे सिद्ध होते. कारण फसवणूक बॅंकेचे ऑडीट करत असतांना लक्षात येते तरीही रिझर्व्ह बँकेने नेमणूक केलेली ऑडीटर ची टिम या त्रुटींकडे दुर्लक्ष करीत असेल व त्या बदल्यात स्वताचे फायदे करून घेते हे उघड उघड दिसते. निव्वळ रिझर्व्ह बँकेच्या चुकी मुळे हे सर्व काही घडत आहे. रिझर्व्ह बँकेने वेळेवरच पैशांची अफरातफर शोधून त्या बॅंकांवर निर्बंध घातले तर ठेवीदारांचे व खातेदारांचे नुकसान होणारच नाही. त्या वेळी जे थोडे फार नुकसान होणार असेल ते नफ्यातून भरून काढता येवू शकते.

परंतू बँकेच्या संचालकांसहीत सर्वांचे हितसंबंध हया कारस्थानामागे जपले जातात व नियोजन बद्ध पद्धतीने बॅंक डबघाईला आणली जाते. शेवटी शेवटी जेव्हा पैसा आपले काम करतो तेव्हा हि बॅंक डबघाईला गेल्याचे जाहीर केले जाते. चोर चोर तर चोर वरून शिरजोर असल्या सारखे रिझर्व्ह बँक भासवते. खरेतर हे जनतेचे पैसे रिझर्व्ह बँक कडून च वसूल केले पाहिजेत. कारण रिझर्व्ह बँके च्या अखत्यारीत ह्या बँका चालतात.रिझर्व्ह बँकेच्या विश्वासावरच लोक बॅंकेत पैसे ठेवतात. त्या मुळे ह्या बँकांच्या डबघाईला रिझर्व्ह बँकेच जबाबदार आहे हे सिद्ध हेते. रिझर्व्ह बँकेवरच आर्थिक फसवणूकी चा गुन्हा दाखल करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे व पैसे ही वसूल केले पाहिजेत तरच बॅंका डबघाईला जाणार नाहीत………पि.के. महाजन……जेष्ठ कर सल्लागार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *