1 डिसेंबरपासून नवनवीन बदल; ‘या’ महत्त्वाच्या बदलांसाठी रहा तयार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ नोव्हेंबर – देशात आर्थिक व्यवहारांशी संबंधित वा अन्य जीवनावश्यक सोयी-सुविधांमध्ये प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वाचे बदल होत आहेत. त्यात वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षाअखेरीला देशात अनेक बदल होतात आणि नवनवीन नियम येतात. यंदा ही देशात 1 डिसेंबरपासून नवनवीन बदल लागू होणार आहेत. यात RTGS, विमा प्रीमियम, रेल्वे आणि एलपीजी गॅसमध्ये नवे बदल होणार असल्यामुळे वर्षाची सुरुवात कोरोना सारख्या महाभयाण व्हायरसने झाली, पण शेवट सरकारच्या काही चांगल्या निर्णयामुळे गोड होणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

1 डिसेंबरपासून RTGS 24X7 उपलब्ध करुन देण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केल्यामुळे तुम्ही कधीही पैसे ट्रान्सफर करु शकतात. सध्या RTGS दुसरा आणि चौथा शनिवार वगळता अन्य दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.

घरगुती एलपीजी गॅसच्या किंमती वाढ होण्याची शक्यता असून या किंमतीत मागील महिन्यात कोणताही बदल झालेला नव्हता.

नवीन एक्सप्रेस 1 डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यात झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोन गाड्यांचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मू-तावी-पुणे-झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

तुम्हाला विमा प्रीमियमची रक्कम आता 5 वर्षानंतर 50%नी कमी करता येईल. म्हणजेच अर्धा हफ्ता देऊन तुम्ही पॉलिसी सुरु ठेवू शकता. 1 डिसेंबरपासून होणारे हे बदल दिलासादायक असून घरगुती गॅसच्या किंमतीत काय बदल होतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *