सामान्य नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंजुरी देणारा ब्रिटन ठरला जगातील पहिला देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ डिसेंबर – जगात कोरोना विषाणूने प्रवेश केला त्याला एक वर्ष झाले असताना त्याचा नायनाट करणारे औषधही तयार झाले आहे. बुधवारी ब्रिटनने अमेरिकी कंपनी फायझर आणि जर्मनीची कंपनी बायाेएनटेकने संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. तीन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण करणाऱ्या लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, ही लस अनेक जीव वाचवण्यासोबतच परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक म्हणाले, ख्रिसमसपूर्वी म्हणजे पुढील आठवड्यापासूनच ८ लाख डोससह ब्रिटन सामान्य नागरिकांना डोस देणे सुरू करेल. फायझर कंपनी बेल्जियममध्ये लस तयार करत आहे. तेथून नवीन वर्षात एक कोटीहून अधिक डोसचा ब्रिटनला पुरवठा केला जाणार आहे.

ब्रिटनमध्ये २२४ वर्षांनंतर एखाद्या महामारीची लस सर्वप्रथम दिली जाईल. १७९६ मध्ये कांजण्यांची लस सर्वप्रथम देण्यात आली होती. त्यानंतर युरोपातील देश आशिया किंवा आफ्रिकी देशांत लसीचा दुष्परिणाम पाहूनच परवानगी देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *