महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ डिसेंबर – आज कर्जतमध्ये मा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आसरा सोशल फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराच आयोजन केलं होतं. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं, अस आवाहन केलं होतं. याच आवाहनाला आसरा फाउंडेशनने प्रतिसाद देत शिबिरांचं आयोजन केलं होतं. यावेळी आसराच्या उपक्रमाला प्रतिसाद देत 163 लोकांनी रक्तदान केलं. तर 3 महिलांनी देखील यावेळी रक्तदान केलं. यावेळी आसरा सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदात्यांना ट्रॅकसुट भेटवस्तू देण्यात आली. यावेळी आसरा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शुभम ताटे, आसरा फाउंडेशन संस्थापक सचिव अमोल होले, आसरा फाउंडेशन संस्थापक खजिनदार आणासाहेब भोईटे यावेळी उपस्थित होते.
आज 3 डिसेंबर हा अपंग सहाय्य ता दिन म्हणून साजरा झाला, यावेळी अपंग रवींद्र मधुकर गदादे यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला. आसरा सोशल फाउंडेशन, राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत, राज्यभर रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज कर्जतमधील जिल्हापरिषद शाळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अक्षय ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली.