दुसऱ्या लाटेची शक्यता कमी : आरोग्यमंत्री राजेश टाेपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ८ डिसेंबर – गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी मागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

साथी, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन आणि जन आरोग्य अभियानच्या वतीने परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आयोजित वेबिनारमध्ये टोपे बोलत होते. या वेबिनारमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, प्रवीणा महादळकर, डॉ. अभय शुक्ला, डॉ. संगीता भुजबळ, सुमन टिळेकर, स्वाती राणे, शकुंतला भालेराव आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *