व्हॉट्सअॅप चे नवीन फीचर्स ; ऑफलाईन राहूनही करा चॅटिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर – लोकप्रिय इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच आता समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यावर आपण व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहोत की ऑफलाईन याची माहिती मिळते. तसेच याआधी किती वाजता समोरची व्यक्ती अथवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी ऑनलाईन होते याबाबत लास्ट सीनच्या माध्यमातून समजते. पण आपण ऑनलाईन आहोत ते काही लोकांना समजायला नको असे वाटत असते. अशाच मंडळींसाठी आता एक खूशखबर आहे.

आता ऑफलाईन राहूनही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगची मजा घेता येणार आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणालाही कळणार नाही. रात्री उशीरापर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल तर अशा लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. समोरची मंडळी अनेकदा ऑनलाईन आहे हे पाहून विनाकारण काही लोक मेसेज करत असतात. काहीवेळा त्यांना रिप्लाय देणे कंटाळवाणे असते. अशावेळी ऑफलाईन राहून अशापद्धतीने चॅटिंग करता येणार आहे. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गुगल प्ले स्टोरवरून सर्वप्रथम WA bubble for chat हे अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर अ‍ॅप अनेक अ‍ॅक्सेसिबिलिटी परमिनशन्स मागेल. त्यावर तुम्हाला allow करावे लागेल. आता व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेजेस तुम्हाल बबल्समध्ये येतील. या चॅटिंगमध्ये तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणालाही दिसणार नाही. तसेच ऑफलाईन राहून आरामात सहज चॅटिंग करू शकता. यासोबतच यामध्ये कोणालाही तुमचा लास्ट सीन दिसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *