महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । उन्हाळी पर्यटनाला बुस्ट मिळालेला असताना विमानांची संख्या कमी आणि प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विमानप्रवास तब्बल ६० टक्क्यांनी महागला आहे.
त्याचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना बसत आहे. नागपूरवरून दुबईला जाणे स्वस्त आहे मात्र, श्रीनगर, लद्दाख, गुवाहाटी, सिक्कीमला जाणे महागात पडत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना दरवाढीचे ‘चटके’ सहन करावे लागणार आहेत.
श्रीनगर, लेह, लडाख, सिक्कीम, गुवाहाटी यासह इतरही पर्यटनस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तुलनेत विमानांची संख्या कमी आहे. देशातील काही प्रमाणात विमानांचे मार्गदेखील कमी झाले आहेत. तसेच अन्य पर्यटन स्थळीदेखील जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. सामान्य दराच्या तुलनेत सुमारे ५५ ते ६० टक्के दरवाढ केली आहे.
असे आहेत दर…
देशाबाहेरील दर
नागपूर ते दुबई : २५ हजार ५००
नागपूर ते सिंगापूर – २५ हजार
देशांतर्गत दर
नागपूर ते श्रीनगर : ३५ हजार
नागपूर – लद्दाख – ४० हजार
नागपूर – गुवाहाटी – ३० हजार
नागपूर- सिक्कीम – ३५ हजार
(हे दर अंदाजे प्रति व्यक्ती परतीच्या प्रवासासह आहेत.)
नागपूर – बंगळुरू – ५ हजार ५००
नागपूर – मुंबई – ६ ते आठ हजार
नागपूर – अहमदाबाद – ६ हजार
(हे दर प्रतिव्यक्ती एकेरी मार्गाचे आहेत)
तिकीट दरवाढीची कारणे
फ्लाइट कमी अन प्रवासी जास्त
देशात एकूण विमानांची संख्या ७१३, पैकी २०० विमाने सेवेत नसलेली
प्रवासी वाहतुकीत विमानांची संख्या कमी