नव्या वर्षात ब्रिटिश टीम भारत दौऱ्यावर येणार, असे असेल वेळापत्रक

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर – टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा (India vs Australia) दौरा संपल्यानंतर इंग्लंडची क्रिकेट टीम (England Cricket) भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनी या दौऱ्याची घोषणा केली आहे. दोन्ही टीममध्ये चार टेस्ट, पाच टी-20 आणि तीन वनडे मॅचची सीरिज होणार आहे.

टेस्ट सीरिजपासून इंग्लंडच्या दौऱ्याची सुरुवात होईल. पहिली मॅच 5 फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरू होईल. तर दुसरी टेस्ट मॅचही चेन्नईमध्येच खेळवली जाईल. उरलेल्या दोन मॅच अहमदाबादच्या सरदार पटेल मोटेरा स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.

मोटेरा क्रिकेट स्टेडियम जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच स्टेडियमवर डे-नाईट मॅचचंही आयोजन करण्यात आलं आहे. अहमदाबादच्या या मैदानात 24 फेब्रुवारीपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होईल. टेस्ट सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये पाच टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येईल. सगळ्या टी-20 मॅच मोटेरा स्टेडियमवरच होणार आहेत. तर तीन वनडे मॅचची सीरिज पुण्यात खेळवली जाईल.

कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने या दौऱ्यात तीनच ठिकाणी सामने ठेवले आहेत. ‘बीसीसीआय दोन्ही टीमच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत आहे. यामध्ये कोणतीही कमी पडू देणार नाही. बीसीसीआय आणि इसीबीच्या मेडिकल टीम सगळ्या प्रोटोकॉलचं पालन करतील,’ असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं.

भारत-इंग्लंड सीरिजचं संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज

5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2021- पहिली टेस्ट- चेन्नई

13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2021- दुसरी टेस्ट- चेन्नई

24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021- तिसरी टेस्ट (डे-नाईट)- अहमदाबाद

4 मार्च ते 8 मार्च 2021- चौथी टेस्ट- अहमदाबाद

टी-20 सीरिज

12 मार्च- पहिली टी-20- अहमदाबाद

14 मार्च- दुसरी टी-20- अहमदाबाद

16 मार्च- तिसरी टी-20- अहमदाबाद

18 मार्च- चौथी टी-20- अहमदाबाद

20 मार्च- पाचवी टी-20- अहमदाबाद

वनडे सीरिज

23 मार्च- पहिली वनडे- पुणे

26 मार्च- दुसरी वनडे- पुणे

28 मार्च- तिसरी वनडे- पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *