देशाच्या दुचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटो ने केली घोषणा, महाराष्ट्रात करणार 650 कोटींची गुंतवणूक;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. 23 डिसेंबर – देशाच्या दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ऑटो महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी 650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्य सरकारसोबत याबाबतचा सामंजस्य करार झाल्याची माहिती कंपनीकडून मंगळवारी देण्यात आली.

बजाज ऑटो पुण्यातील चाकणमध्ये हा कारखाना उभारणार असून या नवीन कारखान्यातून 2023 पर्यंत उत्पादन घेण्यास सुरूवात होईल, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली. “ही गुंतवणूक म्हणजे ज्या राज्यातून आमच्या प्रवासाची सुरूवात झाली त्या राज्याशी आम्हाला असलेली बांधिलकी आहे, आणि कंपनीचा ७५ वा वर्धापन दिन साजरा होत असलेल्याच वर्षी ही गुंतवणूक झाली” असं कंपनीने एका प्रेस नोटमधून सांगितलं. या कारखान्यात केटीएम, Husqvarna आणि Triumph मोटरसायकल्स तयार होतील. याशिवाय नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटरपासून सुरू होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मॅन्युफॅक्चरिंगही याच कारखान्यात होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

दरम्यान, बजाज ऑटोची एकूण विक्री यावर्षी नोव्हेंबरमध्ये 5 टक्क्यांनी वाढून 4,22,240 युनिटवर पोहोचली. नोव्हेंबर 2019 मध्ये कंपनीने 4,03,223 वाहनांची विक्री केली होती.

करोनामुळे अर्थचक्र मंदावले. मात्र, टाळेबंदी शिथिल करून त्यास गती देतानाच राज्य सरकारने वर्षभरात विविध उद्योगांशी एकूण दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार केले. त्यात मंगळवारी २५ करारांचा समावेश झाला. या नव्या करारांद्वारे सुमारे ६१ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, अडीच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *