दिल्लीत आजपासून सुरू होणार स्वयंचलित मेट्रो, मोदींच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर -दिल्लीचे नागरिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो आज अखेर आलाच. पंतप्रधान मोदीींचं स्वप्न आज पूर्ण होणार असून दिल्लीतील नागरिकांना चालकाशिवाय चालणाऱ्या मेट्रो ट्रेननं प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्वयंचलित मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. या मेट्रो ट्रेनला आज पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

ही मेट्रो ट्रेन 37 किमीपर्यंत धावणार आहे. तर देशातील पहिल्या स्वयंचलित ट्रेनचं उद्घाटन हिरवा कंदील दाखवून करण्यात येणार आहे. या ट्रेनला चालक असणार नाही तर संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम असेल.देशातील पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइन आणि पिंक लाइनवर चालविली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ड्रायव्हरलेस ट्रेन जनकपुरी वेस्ट ते नोएडा बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत मॅजेन्टा मार्गावर एकूण 37 किमी अंतर कापणार आहे. त्यानंतर, 2021 मध्ये, पिंक लाइनमध्ये 57 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो चालविण्याची योजना आहे. जे मजलिस पार्क ते शिव विहार पर्यंतचे अंतर व्यापेल. अशा प्रकारे एकूण 94 किलोमीटर चालकविरहित गाड्या सुरू करण्याची मोदी सरकारची योजना आहे.

या मेट्रो ट्रेनची ट्रायल तीन वर्षांपासून सुरू होती. 2017 ला पहिल्यांदा ट्रायल सुरू केली होती ती पूर्ण झाली असून आता प्रत्यक्षात रुळावर ही मेट्रो धावणार असल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं दिली आहे. मेट्रो ट्रेनसारख्याच या ट्रेनला 6 डबे असणार आहे. या ट्रेनचा वेग 95 किलोमीटर ते 85 किमी असणार आहे.

दिल्लीमध्ये पहिल्यांदा 2002 मध्ये मेट्रो धावली होती. आज या घटनेला तब्बल 18 वर्ष पूर्ण होत आहेत. आता राजधानी दिल्लीमध्ये देशातील पहिली स्वयंचलित मेट्रोल धावणार आहे. आजच्या घडीला दिल्लीतील मेट्रोचं जाळं हे जगातील सर्वात मोठं नेटवर्क असल्याचं समजलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *