महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री शशिकांत घुले यांच्या संकल्पनेतुन साकार केलेल्या राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील, पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री.अण्णासाहेब बनसोडे, पिंपरी विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व मा.नगरसेवक श्री.निलेश आप्पा पांढरकर, मा.नगरसेवक श्री.नानासाहेब सुपे, मा.स्वीकृत सदस्य श्री.सतीश काटे, मा.पि.सी.एम.टी. सदस्य श्री.संतोष माचुत्रे, हरीओम ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष श्री.नामदेव गोगावले व इतर मान्यवर उपस्थीत होते.
गेल्या 5 वर्षात कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब बनसोडे यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचा आढावा या दिनदर्शिकेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.