खिलाडी अक्षय कुमार एका चित्रपटासाठी तब्बल एवढे मानधन घेणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर -खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे नाव बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. अक्षय कुमारच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे कारण अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, 108 कोटी रूपयांवरून 135 कोटी रूपये एवढी अक्षयने मानधनात वाढ केल्याचे म्हटले आहे. अक्षयने यापूर्वी 99 कोटींवरून 108 कोटी एवढी वाढ केली होती.


दरम्यान अक्षय कुमार त्याचा चांगला मित्र फिरोज नाडियावाला याला काही प्रमाणात सूटही देत असल्याची चर्चा आहे. अक्षयचे जवळपास 4-5 चित्रपट प्रत्येक वर्षी प्रदर्शित होतात. सध्या अक्षयकडे पृथ्वीराज, राम सेतु, मिशन लायन, रक्षाबंधन हे आगामी चित्रपट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *