महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – कोरोना व्हायरसची माहिती जेव्हा पहिल्यांदा समोर आली होती, तेव्हा याच्या वेगवेगळी लक्षणे समोर आली होती. वैज्ञानिकांनाही या व्हायरसबाबत रोज नवीन गोष्टी समजतात. तज्ज्ञांनी कोरोनाची काही मुख्य लक्षणे सांगितली आहेत. ज्यात ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, पोटासंबंधी संक्रमण, चव किंवा गंध न समजणे इत्यादींचा लक्षणांचा समावेश होता.
VUI 202012/01 असे नाव कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला देण्यात आले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामध्ये स्पाइक प्रोटीन असल्याची बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनुसार, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये स्पाइक एक आनुवांशिक परिवर्तन आहे. जो लोकांच्या शरीरात सहजपणे आणि वेगाने पसरत आहे. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने कोरोना मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि सेल्स आपल्या ताब्यात घेतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये १७ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असण्याची बाब समोर आली आहे. या म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटीनही आहे जे कोरोना व्हायरस फॅमिलीला त्याचं नाव देतो.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणेही पहिल्या कोरोना सारखीच आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने नवीन कोरोनाच्या स्ट्रेनची ५ गंभीर लक्षणे सांगितली आहेत. यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. ही लक्षणे जर तुम्हालाही जाणवली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यात श्वास घेण्यास त्रास होणे, भ्रम झाल्यासारखे वाटणे, सतत छातीत दुखणे, थकवा जाणवणे, चेहरा आणि ओठ निळे पडणे या लक्षणांचा समावेश आहे.
