चाैथ्या कसाेटी आता वादाच्या भाेवऱ्यात; कडक नियमावलीने रूमच्या बाहेर पडण्यास मनाई, भारताची नाराजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ४ जानेवारी – भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटी आता वादाच्या भाेवऱ्यात अडकली आहे. ब्रिस्बेनमध्ये या कसाेटीचे आयाेजन करण्यात आले. तिसरी कसाेटी सिडनीमध्ये हाेणार हाेती. मात्र, या ठिकाणी काेराेनाच्या केसेसमध्ये वेगाने वाढ हाेत आहे. हाच धाेका लक्षात घेऊ‌न आता तिसरी कसाेटी मेलबर्नमध्ये आयाेजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर चाैथी कसाेटी ब्रिस्बेनमध्ये घेण्याचे ठरले. सिडनी हे न्यू साऊथ वेल्समध्ये आणि ब्रिस्बेन हे क्वीन्सलँडमध्ये आहे. दरम्यान, सिडनीमधील काेराेनाच्य वाढत्या धाेक्यामुळे क्वीन्सलँडने आपल्या बाॅर्डर बंद केल्या आहेत. त्यामुळे दाेन्हीकडील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, यादरम्यान फक्त खेळाडंूना प्रवेशाची संधी देण्यात आली. परवानगी देण्यात आलेल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी कडक नियमावली आहे. रूममध्ये गेल्यानंतर काेणत्याही खेळाडूला बाहेर पडता येणार नाही. फक्त सराव आणि सामना खेळण्यासाठीच रूमच्या बाहेर पडण्यास परवानगी आहे.

कडक नियमावलीने भारतीय खेळाडू अडचणीत
काेराेनाच्या धाेक्यामुळे क्वीन्सलँडने कडक नियमावली जाहीर केली. याच प्राेटाेकाॅलवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. यादरम्यान टीम इंडियाने दाेन्ही कसाेटी सामने सिडनीमध्ये खेळण्याची विनंती केली. मात्र, यावर स्थानिक आराेग्यमंत्र्यांनी यासाठी कुठल्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसल्याचे ठणकावून सांगितले. प्राेटाेकाॅलचे उल्लंघन करून नवीन वर्षाची पार्टी करण्याचे टीम इंडियाच्या खेळाडूंचे प्रकरण ताजेच आहे. याच कारणामुळे क्वीन्सलँडने कडक नियमावली तयार केली.

क्वीन्सलँड सरकारची २०० काेटींची कमाई
चाैथ्या कसाेटी सामन्याच्या आयाेजनातून क्वीन्सलँड सरकारला तब्बल २०० काेटी रुपयांच्या कमाईची संधी आहे. मात्र, असे असतानाही या ठिकाणी काेराेनाचा धाेका वाढू नये याचेही आव्हान आहे. त्यामुळे येथे हाॅटेलसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. यातून काेराेनाचा धाेका वाढणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आली. हाॅटेलच्या स्पेशल एरियामध्ये खास बायाे बबल तयार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *