पहाटे चार वाजता रोहित पवार एपीएमसीत, दिलं ‘हे’ आश्वासन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ जानेवारी – आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आज पहाटे चार वाजता अचानक नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) भेट दिली. पहाटे ते बाजार समितीतल्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये दाखल झाले. मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. शेतकऱ्यांसाठी एपीएमसी आवश्यक आहे. केंद्राने कृषी कायदा देशावर लादला असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार एपीएमसीबाबत योग्य निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *