पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, दरांमध्ये 29 दिवसांनंतर आज बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel Price Today) दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील बदल जाहीर करत असतात. त्यामुळे दररोज सामान्य माणसाचं लक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर असतं (Petrol And Diesel Price Today).

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 29 दिवसांनंतर आज बदल झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात 25 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोल 24 ते 26 पैसे वाढलं आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, बुधवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 83.97 रुपये प्रति लीटर झाले, तर मुंबईत 90.60 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा रेट 85.44 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत पेट्रोल 86.75 रुपये प्रति लीटर आहे.

दिल्लीत डिझेलचे भाव आज 74.12 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. तर मुंबईत डिझेलचे दर 80.78 प्रति लीटरवर पोहोचले आहेत. कोलकात्यात डिझेलचे दर 77.70 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये डिझेलचे दर 79.46 रुपये प्रति लीटर इतके आहेत.

मुख्य शहरांतील पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 83.97 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 90.60 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 85.44 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 86.75 रुपये प्रति लीटर

मुख्य शहरांतील डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 74.12 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 80.78 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 77.70 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 79.46 रुपये प्रति लीटर

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol And Diesel Price Today).

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *