अजून २ खेळाडू जायबंदी ; भारतीय संघाला धक्का, पंत नंतर रवींद्र जडेजाही मैदानाबाहेर

Spread the love

Loading

हाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – तिसरा कसोटी सामना सुरु असतानाच भारतीय संघाला दुसरा धक्का बसल्याचेही आता समोर आले आहे. तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळेच पंतला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण आता दुखापतीमुळेच भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा मैदानाबाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे.


तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना जडेजाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतरही जडेजा फलंदाजी करत होता. पण भारताचा डाव संपल्यावर मात्र जडेजा हा मैदानात खेळताना दिसला नाही. त्यामुळे आता पंतनंतर जडेजाही दुखापतग्रस्त झाला असून हा भारतासाठी अजून एक मोठा धक्का आहे. जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघापुढे गोलंदाजीचे पर्याय कमी पडू शकतात. पण जडेजाच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती बीसीसीआयने अद्याप दिलेली नाही.

भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यातही मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला दुखापत झाली असून ती गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पंतला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्यानंतर हनुमा विहारी यांना मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्यामध्ये चांगली भागीदारी होत होती. ही भागीदारी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बाऊन्सर्सचा वापर केला. यामधील एक बाऊन्सर पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला लागला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून आता त्याला तिसऱ्या दिवशी तरी खेळता येणार नाही, असे दिसत आहे.

तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना भारताचा दुसरा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली. भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनाच अर्धशतक झळकावता आले. अन्य खेळाडूंना मोठी खेळी साकारता न आल्यामुळेच भारतीय संघाला पहिल्या डावानंतर आघाडी घेता आली नाही. भारताचे तीन फलंदाज यावेळी धावचीत झाले आणि याचा मोठा फटका संघाला बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *