बर्ड फ्लू ची भीती, दर निम्म्यावर आल्याने चिकन व्यवसायावर परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – राज्यात बर्ड फ्लूचा कुठला धोका नसताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, दर निम्म्यावर आले आहेत. चिकन व्यावसायिकांकडून खरेदी केली जाणाऱ्या कोंबडीचं प्रमाण निम्म्यावर आलंय. जिल्हा अंतर्गत पुरवठाही मंदावला आहे. सर्वांचा उद्योग ठप्प झाला आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक संख्या घटली आहे. शिवाय जे ५० टक्के ग्राहक येत आहे. त्यांच्यात भीती दिसून येत आहे. चिकनचे आणि जिवंत कोंबडीचे दरही कमालीचे घसरले आहेत.

देशाच्या काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्तर व पश्चिम भारतातील कोंबडीची विक्री कमी झाली आहे. कोंबडी कंपन्यांच्या विक्रीत घट झाल्यामुळे किंमती 20 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. अंडीचे दरही कमी झाले आहेत.

दक्षिण भारतात कोंबड्यांची विक्री 30 टक्क्यांनी घसरली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात विक्री 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने उत्तर भारतात पोल्ट्रीमधून खरेदी केलेल्या कोंबडीची किंमत 30 टक्क्यांनी कमी केली आहे. त्याचबरोबर अंड्यांची किंमत प्रति अंडी सात टक्क्यांनी घसरून 5.50 रुपयांवर आली आहे. किरकोळ दुकानांत अद्याप किंमत कमी झालेली नाही.

पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की बर्ड फ्लूशी संबंधित काही अफवा देखील पसरत असल्या तरी कोंबडीची अंडी व अंडी विक्री अर्ध्यावर गेली आहे. पंजाब पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनने म्हटले आहे की 2006 पासून बर्ड फ्लू पोल्ट्री उद्योगासाठी चिंतेचे कारण बनले आहे. भारतात बर्ड फ्लूमुळे आजपर्यंत पक्ष्यांपासून मनुष्यांपर्यंत कोणताही रोग पसरलेला नाही. आतापर्यंत केरळमधून बर्ड फ्लू झाल्याची पुष्टीची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूचा आजार फक्त बदकामध्ये दिसून आला आहे. बर्ड फ्लू आजाराची नोंद देशात 2006 मध्ये पहिल्यांदा झाली होती. त्यावेळी बर्ड फ्लूचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील नवापुरात हजारो पक्षी मारले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *