कलागुणांना वाव देणारा “आविष्कार” भारतीय संस्कृतीचा , प्रेरणा विद्यालयात सादर

Loading

महाराष्ट्र 24 , पिंपरी चिंचवड – 13 जानेवारी-
दि. 8 जानेवारी संध्या. ५ वाजता निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोहळा नुकताच पार पडला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते “मुळशी पॅटर्न ” फेम मा. श्री .अनिकेत घुले तसेच “गर्ल्स” फेम सिनेअभिनेत्री मा. डॉ.कु.अंकिता लांडे उपस्थित होते .
मुख्याध्यापिका मा. सौ. सीमा महाजन यांच्या संकल्पनेतून यावर्षी भारतातील विविध राज्यांच्या लोककला व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण करून सर्वात शेवटी भारताची विविधतेतून एकता कशी दिसते यावर आधारित उत्तम नृत्य सादर केले गेले . या नृत्यात एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते , या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. सीमा महाजन यांनी भारतीय परंपरा जपण्याचा संदेश दिला कार्यक्रमास कॅम्प एज्युकेशन सोसायटी चे सदस्य मा.श्री. शशिकांत पवार साहेब उपस्थित होते .
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हिंदी राष्ट्रभाषा ,संस्कृत परीक्षा, क्रीडा स्पर्धा , अष्टपैलू विद्यार्थी, चित्रकला ग्रेड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली . “अविष्कार भारतीय संस्कृतीचा” या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले याकरिता अनिकेत घुले यांनी आनंद व्यक्त करून मुख्याध्यापकांचे आभार मानले. सिने अभिनेत्री डॉ. कु अंकिता लांडे यांनी शाळेच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले . सदर कार्यक्रमासाठी संस्थेतर्फे रु. 11000 /- हजार , संस्थेचे सदस्य मा. श्री. शशिकांत पवार साहेब यांच्यातर्फे रु. 5000 /- तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सीमा महाजन यांच्यातर्फे रु. 10000 /- अशी उत्स्फूर्त पारितोषिके देण्यात आली .
प्रास्ताविक सौ. लीना मोहिते यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. मंजीरी ब्रम्हे यांनी केले. अहवाल वाचन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा महाजन यांनी केले तर आभार कार्यवाह सौ. शर्मीला आचारी यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *