महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ जानेवारी -राज्य सरकारकडून 12528 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये मराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने आधीचा शासन निर्णय रद्द करत नवीन शासन निर्णय काढला आहे. यानुसार एसईबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेली पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे ईडब्लूएस प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांना ईडब्लूएसमधूनही अर्ज भरता येईल.