लाव्हाची स्मार्टफोन बाजारात दमदार एंट्री

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी – भारतीय हँडसेट निर्माती कंपनी लाव्हाने भारतात पुन्हा नव्याने स्मार्टफोन बाजारात उतरण्याचे निश्चित केले आहे. याकरीता कंपनीने 800 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची योजना आखली असल्याचे समजते. नव्या योजनेचा आराखडा कंपनीने तयार केला आहे. स्थानिक निर्मितीत वाढ करण्यावर कंपनी भर देणार असून 20 हजाराच्या आतील 5 जी सेवेची उत्पादने सादर करण्याची तयारी कंपनीने केली आहे. कंपनी 6 हजार ते 10 हजार रुपये किंमतीच्या घरातील मोबाइल फोन्स आणण्यावर भर देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *