परीक्षांचे नियोजन अंतिम टप्प्यात ; दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कमी करणे अशक्य, शालेय शिक्षणमंत्र्याचे स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० जानेवारी – बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन अंतिम टप्प्यात असून आता परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम 50 टक्क्यांपर्यंत कमी करणे अशक्य आहे, असे शालेय शिक्षणमंञी वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. परीक्षेसाठी शिक्षण मंडळ गेल्या दोन एक महिन्यांपासून तयारी करीत असून प्रश्नपत्रिकांची आखणी, छपाई ही कामे सुरू झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे आँनलाईन अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यंदा उशीराने सुरू झाले. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ नसल्याने अभ्यासक्रम 50 टक्क्यांपर्यंत कमी करा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे. या मागणीबाबत शिक्षणमंञ्यांनी भूमिका स्पष्ट केली. याआधीच अभ्यासक्रमात 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली असून अभ्यासक्रम आणखी कमी करणे शक्य नसून या घडीला अभ्यासक्रम कमी केल्यास नियोजन बिघडेल असेही त्या म्हणाल्या.

बालचिञवाणीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाला असून या काळात बालचित्रवाणीच्या जुन्या सीडी, व्हीसीडी किंवा जो काही पंटेन्ट होता त्याची पाहणी करण्याचा सुचना अधिकार्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातील काही गोष्ट अद्ययावत करून त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणयाचा मानस असल्याचे त्या म्हणाल्या.

शालेय शुल्काबाबत न्यायालय योग्य निर्णय देईल
शुल्कावरून शाळा आणि पालक यांच्यात मोठा वाद होत असून फीवाढी संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय न्यायप्रविष्ठ असून उच्च न्यायालया याबाबत काय निर्णय देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. मात्र सरकारचा निर्णय कायम राहावा यासाठी आमचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *