महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० जानेवारी – कबुतरांना शांती आणि प्रेमाचे प्रतिक मानले जाते. समाजात शांती, प्रेम, सलोखा राखला जावा. हा संदेश देत सालाबादप्रमाणे याही वर्षी ही शांतिदूत म्हणून 1000 कबुतरे आकाशात सोडून खंडोबा यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन आकुर्डी गाव येथील महापालिकेच्या मराठी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. बॉबी यादव व श्री.सनी सरपटा यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास पिंपरीचे कार्यसम्राट आमदार आण्णा बनसोडे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे यात्रा, धार्मिक कार्यक्रम शासनाने रद्द केले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमिवर हा कार्यक्रम साध्या पद्धतीने औपचारिकरित्या पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री. निलेश आप्पा पांढरकर ,उद्योजक माऊली सुर्यवंशी, गाडा मालक गणेश गुजर, आणि मित्र परिवार आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या नियमांचे पालन करून आयोजकांनी साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच शांती आणि प्रेमाचे प्रतिक असलेल्या कबुतरांना आकाशात सोडण्याच्या अनोख्या पद्धतीचे कौतुकही केले.