१९६५, १९७१च्या युद्धातील सैनिकांसाठी विशेष पेन्शन योजना

Loading

महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडून १९६५ आणि १९७१ या वर्षांमध्ये पाकिस्तानविरोधात लढल्या गेलेल्या युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांना खास पेन्शन देण्याची योजना आखत आखत आहे. मंगळवारी आर्म्ड फोर्सेस वेतरन डे armed forces veterans day या दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी याविषयीची माहिती दिली. 

संरक्षण मंत्रालयाकडे यासंदर्भात एक प्रस्ताव पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘सेना मुख्यालयाने अनेक प्रस्ताव पाठवले आहेत. ज्यापैकी एका प्रस्तावात नमूद केल्यानुसार १९६५ आणि १९७१ या वर्षांत पाकिस्तानविरोधात लढल्या गेलेल्या युद्धातील इमर्जेन्सी कमीशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमीशन या हुद्द्यावर असणाऱ्या सैनिकांना स्वतंत्रता सेनानी पेन्शन योजनेप्रमाणेच खास योजनेअंतर्गत पेन्शन देण्याच येण्याची बाब मांडण्यात आली आहे’, असं ते म्हणाले.

१९६५ आणि १९७१च्या युद्धादरम्यान अधिकाऱ्यांची कमतरता भासल्यामुळे मोठ्या संख्येने इमर्जेन्सी आणि शॉर्ट सर्व्हिस कमीशन अंतर्गत सैनिकांनी भरती करण्यात आली होती. सेवा पूर्ण करत लगेचच सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यामुळे इमर्जेन्सी आणि शॉर्ट सर्व्हिस कमीशन या हुद्द्यांवर असणाऱ्या सैनिकांना पेन्शनची सुविधा मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *