नवा कोरोना विषाणू जास्त घातक ; इंग्लंडचे पंतप्रधान यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ जानेवारी – ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या शेवटी सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक घातक असून तो वेगाने पसरतो. तसेच त्याचा मृत्युदरसुद्धा खूप आहे, अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.(new corona strain is too much dangerous said boris johnson)

पंतप्रधानांनी नेमलेल्या कोरोनाविषयक एका सल्लागार गटाने विविध निरीक्षण केले.या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे. जॉन्सन म्हणाले की,”आम्हाला ही माहिती मिळाली असून आम्ही त्यावर चर्चा करत आहोत. मात्र नवीन आलेल्या फायझर आणि ऑक्सफर्ड या लसी या नव्या स्ट्रेनवर परिणामकारक ठरल्या आहेत हे आशादायक आहे”,असेही त्यांनी सांगितले.

वर्चुअल पद्धतीने त्यांनी या नव्या विषाणूबद्दल माहिती दिली.ते म्हणाले की, “नव्या विषाणूमुळे आमच्या सर्वच यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. पहिल्यांदा हा नवा विषाणू सापडल्यानंतर थोड्याच कालावधीत हा विषाणू सर्वत्र पसरला.जगातील ५० देशात याचा थोड्या वेळातच प्रसार झाला. त्यावेळी तो अधिक वेगाने पसरत असल्याची आणि घातक असल्याची माहिती आम्ही दिली होती.आता तो खरच घातक असल्याचे पुराव्यानुसार समोर आले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *